काळा करकोचा

काळा करकोचा हा पक्षी साधारण १०० सें. मी आकारमानाचा आहे. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंतचा भाग पांढरा, चोच तांबड्या रंगाची, लांब आणि अणकुचीदार तर पायही तांबड्या रंगाचे असतात.

काळा करकोचा, काळा ढोक
शास्त्रीय नावसिकोनिया नायग्रा
(Ciconia nigra)
कुळबलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशब्लॅक स्टॉर्क
('"Black Stork)
संस्कृतकृष्ण महाबक, कुरंटक
हिंदीसुरमाल, सुरमाई

हा करकोचा उत्तर भारतात तसेच पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार येथे युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून येतो.

काळा करकोचा जलचर पक्षी असून तो मांसभक्षी आहे. मासोळ्या, बेडूक, कीटक, इतर पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, सरडे, गोगलगायी हे याचे मुख्य अन्न आहे.

मध्य युरोपमध्ये एप्रिल-मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर, काटक्यांचे बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते.

चित्रदालन

संपादन


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ