काळा करकोचा

काळा करकोचा हा पक्षी साधारण १०० सें. मी आकारमानाचा आहे. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंतचा भाग पांढरा, चोच तांबड्या रंगाची, लांब आणि अणकुचीदार तर पायही तांबड्या रंगाचे असतात.

काळा करकोचा, काळा ढोक
शास्त्रीय नावसिकोनिया नायग्रा
(Ciconia nigra)
कुळबलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशब्लॅक स्टॉर्क
('"Black Stork)
संस्कृतकृष्ण महाबक, कुरंटक
हिंदीसुरमाल, सुरमाई

हा करकोचा उत्तर भारतात तसेच पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार येथे युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून येतो.

काळा करकोचा जलचर पक्षी असून तो मांसभक्षी आहे. मासोळ्या, बेडूक, कीटक, इतर पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, सरडे, गोगलगायी हे याचे मुख्य अन्न आहे.

मध्य युरोपमध्ये एप्रिल-मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर, काटक्यांचे बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते.

चित्रदालन

संपादन


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळावसंतराव नाईकज्ञानेश्वरकृषि दिन (महाराष्ट्र)संत तुकाराममुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधारोहित शर्माआषाढी वारी (पंढरपूर)विराट कोहलीक्लिओपात्रानिरोष्ठ रामायणशाहू महाराजपांडुरंग सदाशिव सानेआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकदिशानवग्रह स्तोत्रए.पी.जे. अब्दुल कलामबाबासाहेब आंबेडकरराहुल द्रविडअश्वत्थामागणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील जिल्हेश्यामची आईविठ्ठलभारताचे संविधाननामदेवसंत जनाबाईमहाराष्ट्रसूर्यकुमार यादवब्रह्मकमळमराठी संतस्तनाचा कर्करोगकेशव महाराजकल्की अवतारमहाराष्ट्र शासनपसायदानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी