किमान वेतन कायदा

किमान वेतन कायदा (mr); 최저임금법 (ko); Minimum wage law (en); قانون حداقل دستمزد (fa); 最低工資法 (zh); قانون الحد الأدنى للأجور (ar)

किमान वेतन कायदा हा किमान वेतन मोबदला म्हणून दिलेच पाहिजे यासाठी बनवला जातो. जगातील सुमारे ९०% देशात हा कायदा अस्तित्वात आहे. याची अंमलबजावणी निरनिराळ्याप्रकारे होते. न्यू झीलँड या देशाने जगात सर्वप्रथम हा कायदा केला.

किमान वेतन कायदा 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

किमान वेतन कायदा हा भारत सरकारचा वेतन निश्चिती करणारा कायदा आहे. भारत सरकारच्या केंद्र योजनांमध्ये, १९४८ च्या किमान वेतन कायद्यानुसार, किमान वेतन दरामधील दुरुस्ती होत असते. राज्य पातळीवरही ह्यामधील दुरुस्त्या वेळोवेळी झाल्या आहेत. अधिसूचित रोजगारांसाठी ठरवून दिलेले किमान वेतनाचे दर, शेतीक्षेत्रासहित, सर्व संघटित तसेच असंघटित उद्योगांना लागू असतात.केंद्र आणि राज्य सरकारी पातळीवरील सर्व अधिसूचित रोजगारांमधील अकुशल कामगारांसाठीच्या किमान वेतनाची तसेच शेतीक्षेत्रातील अधिसूचिकत रोजगारांमधील अकुशल कामगारांसाठीच्या किमान वेतनाची अंमलबजावणी आवश्यक असते अन्यथा संस्थेचा प्रमुख यासाठी जबाबदार असतो. कायद्याची अमलबजावणी दोन पातळ्यांवर केली जाते. केंद्र सरकारी पातळीवरील अंमलबजावणीचे काम मुख्य मजूर आयुक्त उर्फ सेंट्रल इंडस्ट्रिअल रिलेशन्स मशिनरीच्या निरीक्षक अधिकाऱ्या द्वारे केले जाते. राज्यपातळीवरील अंमलबजावणीसाठी भारतातील राज्यांच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांच्यामार्फत नियमित तपासण्या केल्या जातात आणि वेतन न देण्याचे किंवा किमान दरापेक्षा कमी देण्याचे प्रकार आढळल्यास मालकाला त्याबाबत सूचना दिली जाते. कायद्याचे पालन न झाल्यास कायद्याचे कलम २२ नुसार दंडात्मक कारवाई केली जाते.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठवटपौर्णिमाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रनालंदा विद्यापीठसंत तुकाराममहाराष्ट्रभारतसिकलसेलरायगड (किल्ला)शाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीज्ञानेश्वरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे संविधानमराठी संतपांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरगजानन दिगंबर माडगूळकरआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक दिवसपसायदानआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीहिंदू दिनदर्शिकामहाराष्ट्रातील किल्लेमुंजा (भूत)शिवाजी महाराजांची राजमुद्रामुरलीकांत पेटकरमहाराष्ट्रातील आरक्षणनामदेवमराठी भाषा