नाझी छळछावण्या

नाझी जर्मनीने तिच्या प्रभावाखालील भागांमध्ये अनेक छळछावण्या (जर्मन: Konzentrationslager किंवा KZ) स्थापित केल्या. पहिली छळछावणी जर्मनीत उभारली गेली व इ.स. १९३३मधील राइशस्टागच्या आगीनंतर त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली. राजनैतिक कैदी व शासनाचे शत्रू यांच्यासाठी या छावण्या बनविण्यात आल्या होत्या. त्यांना इंग्रजीत कॉन्सनट्रेशन कॅम्प (इंग्लिश: concentration camp) म्हटले जाते व हा शब्द द्वितीय ॲंग्लो-बोअर युद्धामधील छावण्यावरून घेतला गेला.

अमेरिकन सैन्य जर्मन वायमार प्रजासत्ताकातील लोकांना बुखेनवाल्ड छळछावणीत सापडलेले मृतदेह दाखवत असतांना

इ.स. १९३९ ते ४२ दरम्यान छळछावण्यांची संख्या चार पटीने वाढली. इ.स. १९४२मध्ये तीनशेहून अधिक छावण्या उभारल्या गेल्या होत्या. त्यामध्ये युद्धकैदी, ज्यूधर्मीय, अपराधी, समलैंगिक संबंध ठेवणारे, जिप्सी, मानसिकदृष्ट्या आजारी व इतर अनेकांना न्यायालयीन चौकशीविना ठेवण्यात आले होते. होलोकॉस्ट अभ्यासकांनुसार छळछावण्या या संहारछावण्यांपेक्षा वेगळ्या मानल्या जातात. संहारछावण्यांचा मुख्य उद्देश जर्मन अधिपत्याखालील ज्यूधर्मीय लोकांचा व छळछावण्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर संहार करणे हा होता.

🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने