मुफ्ती महंमद सईद

भारतीय राजकारणी

मुफ्ती महंमद सईद (१२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री राहिले होते.

मुफ्ती महंमद सईद

कार्यकाळ
१ मार्च २०१५ – ७ जानेवारी २०१६
मागीलराष्ट्रपती राजवट
पुढीलराष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
२ नोव्हेंबर २००२ – २ नोव्हेंबर २००५
मागीलराष्ट्रपती राजवट
पुढीलगुलाम नबी आझाद

कार्यकाळ
१९८९ – १० नोव्हेंबर १९९०
पंतप्रधानव्ही.पी. सिंग
मागीलबुटासिंग
पुढीलचंद्रशेखर

जन्म१२ जानेवारी १९३६ (1936-01-12)
बिजबेहारा, अनंतनाग जिल्हा
मृत्यू७ जानेवारी, २०१६ (वय ७९)
नवी दिल्ली
राजकीय पक्षजम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (१९९९ - २०१६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९ पर्यंत)
नातेमेहबूबा मुफ्ती (मुलगी)
गुरुकुलअलीगढ मुस्लिम विद्यापीठ
धर्ममुस्लिम

२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, भारतीय जनता पक्षाला २५ तर नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदावर आली.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्रासत्यवतीमुखपृष्ठशाहू महाराजशिवाजी महाराजविशेष:शोधासंत तुकाराममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीवटपौर्णिमादिशाज्ञानेश्वरकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवेखंडरायगड (किल्ला)भारताचे संविधाननामदेवएकनाथ शिंदेकाळाराम मंदिरमुंजा (भूत)इतर मागास वर्गमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदानपांडुरंग सदाशिव सानेमहात्मा गांधीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतमहाराष्ट्र शासनमुरलीकांत पेटकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी संतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी