मोसमी पाऊस

वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते.

भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा.

असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागरअरबी समुद्र यांवरून येतात.

२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात.

दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनोला निनो हे सागरी प्रवाहही आहेत.

भारतावर मान्सून दाखल झाल्याच्या वर्षागणिक तारखा

संपादन
  • इ.स. २००५ - ७ जून
  • इ.स. २००६ - २६ मे
  • इ.स. २००७ - २८ मे
  • इ.स. २००८ - ३१ मे
  • इ.स. २००९ - २३ मे
  • इ.स. २०१० - ३१ मे
  • इ.स. २०११ - २९ मे
  • इ.स. २०१२ - ५ जून

वर्ष, भारतावर पडलेल्या पावसाची टक्केवारी आणि दिलेला अंदाज

संपादन
१९९२९३ %९२ %
१९९३१०० %१०३ %
१९९४११० %९२ %
१९९५१०० %९७ %
१९९६१०३ %९६ %
१९९७१०२ %९२ %
१९९८१०५ %९९ %
१९९९९६ %१०८ %
२०००९२ %९९ %
२००१९१ %९८ %
२००२८१ %१०१ %
२००३१०२ %९६ %
२००४८७ %९८ %
२००५९९ %९८ %
२००६१०० %९२ %
२००७१०६ %९३ %
२००८९८ %१०० %
२००९७८ %९३ %
२०१०१०२ %१०२ %
२०१११०२ %९५ %
२०१२९३ %99%
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल