क्रिकेटच्या खेळात यष्टिचीत(stumped-out) हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.

यष्टिचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे -

  • टाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नये. वाईड चेंडू चालतो.
  • खेळत असलेला फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्‍न सोडून अन्य कारणास्तव आपली क्रीझ सोडून पुढे गेलेला असला पाहिजे.
  • चेंडू बॅटला न लागता यष्टिरक्षकाकडे गेला पाहिजे.
  • फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल.
  • यष्टिरक्षकाने चेंडू यष्टीवर फेकून मारून अथवा चेंडू हातात ठेवून आपल्या त्याच हाताने यष्टी मोडली पाहिजे.
  • या क्षणी फलंदाज क्रीझच्या बाहेर पाहिजे.

यष्टिचीत झालेल्या फलंदाजाबद्दल गोलंदाजाला व यष्टिरक्षकाला श्रेय देण्यात येते.

🔥 Top keywords: शाहू महाराजपदवीधर मतदारसंघक्लिओपात्राशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेमुखपृष्ठविशेष:शोधासंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरओम बिर्लासामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)दिशानवग्रह स्तोत्रजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरमहाराष्ट्रथोरले शाहू महाराजभारताचे संविधानमराठी संतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामशरद पवारआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्र शासनकृष्णरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदाननिलेश लंकेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नामदेवआषाढी वारी (पंढरपूर)मराठी भाषाशिववर्ग:मराठी नाटकांची यादीसुनीता विल्यम्स