नोव्हेंबर ९
दिनांक
(९ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१३ वा किंवा लीप वर्षात ३१४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९०७ - इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
- १९१३ - अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसऱ्याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
- १९२३ - म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलीस व सैन्याने चिरडून काढला.
- १९३७ - जपानने शांघाय शहर जिंकले.
- १९३८ - जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.
- १९४७ - जुनागढ भारतात विलीन झाले.
- १९५३ - कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
- १९८५ - अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
- १९९० - नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९० - मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
- १९९४ - डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
- १९९८ - आपल्या गिऱ्हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.
एकविसावे शतक
संपादन- २००५ - आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.
- २०१३ - सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.
जन्म
संपादन- १८४१ - एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
- १८७७ - अल्लामा इकबाल, भारतात जन्मलेला पाकिस्तानचा राष्ट्रकवी.
- १८८२ - ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८५ - आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
- १९३१ - टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४३ - जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- इ.स. १९९३ - श्रीपाद नागनाथ राऊतवाड, मराठी युवा साहित्यिक.
मृत्यू
संपादन- ९४९ - कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ११८७ - गाओझॉॅंग, चीनी सम्राट.
- १५०४ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
- १९३७ - राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९४० - नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५३ - अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९७० - चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
- २००५ - के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
🔥 Top keywords: शाहू महाराजपदवीधर मतदारसंघक्लिओपात्राशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेमुखपृष्ठविशेष:शोधासंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरओम बिर्लासामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)दिशानवग्रह स्तोत्रजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरमहाराष्ट्रथोरले शाहू महाराजभारताचे संविधानमराठी संतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामशरद पवारआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्र शासनकृष्णरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदाननिलेश लंकेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नामदेवआषाढी वारी (पंढरपूर)मराठी भाषाशिववर्ग:मराठी नाटकांची यादीसुनीता विल्यम्स