अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.[१]

गणेश मूर्ती दर्शन

धार्मिक महत्त्व

संपादन
नैवेद्याला उकडीचे मोदक

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे.[२] या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात.

भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात..[३]

कथा व व्रत

संपादन

मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.[४]

हे सुद्धा पहा

संपादन

गणपती

गाणपत्य संप्रदाय

संदर्भ

संपादन
  1. ^ Babar, Sarojini Krishnarao (1987). Mahārāshṭra, loka saṃskr̥ti va sāhitya (हिंदी भाषेत). Neśanala Buka Ṭrasṭa, Iṇḍiyā.
  2. ^ Gadgil, Amarendra Laxman (1981). Śrīgaṇeśa kośa: bhāvika bhakta, upāsaka, āṇi abhyāsaka aśā sarvã̄sāṭhĩ̄ Gaṇeśa daivatavishayaka sarva jñānācā saṅgrāhya sādhana-grantha. Śrīrāma Buka Ejansī.
  3. ^ "25 दिसंबर को अंगारकी चतुर्थी". नवभारत टाईम्स-मुंबई समाचार. २२.१२.२०१८. १२.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ जोशी, महादेवशास्त्री (२०१० पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृतीकोश खंड पहिला. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. १७-१८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)