सुवर्णदुर्ग

महाराष्ट्रातील एका बेटावरील किल्ला, भारत

सुवर्णदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[१] दापोली शहरापासून हर्णे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा उपलब्ध आहे.[२]

सुवर्णदुर्ग
[[Image:
Fortification of Suvarnadurga
|500| ]]
सुवर्णदुर्ग
नावसुवर्णदुर्ग
उंची1400
प्रकारजलदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणरत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गावदापोली, हर्णे
डोंगररांग5000
सध्याची अवस्थाचांगली
स्थापना{{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान

संपादन
प्रवेशद्वार

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग[३] या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,[४] फत्तेदुर्ग आणि गोवागड.[५]

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

संपादन
मुख्य प्रवेशद्वार

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[६]

कसे जाल?

संपादन

मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते. मुंबई एअरपोर्ट वरून २५० किलोमीटर अंतर हर्णे बंदर आहे मुंबईवरून रेल्वे येण्याची सोय आहे मुंबई ते खेड रेल्वे स्थानक येऊन नंतर बसने दापोली नंतर दापोली मधून बसने हर्णे बंदर जाता येते.बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.

किल्ल्याविषयी

संपादन

दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती अर्वाचीन असावी. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात.

दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती असे मानले जाते. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ मराठ्यांची बखर. Saptarshee Prakashan. 2020-02-19.
  2. ^ "पर्यटनातून कोकणचा 'सुवर्णदुर्ग' आता जगभरात पोचणार". सकाळ. 2021-11-05. 2024-01-01 रोजी पाहिले.
  3. ^ दापोली, तालुका. "सुवर्णदुर्ग". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-03-31. 2019-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ दापोली, तालुका. "कनकदुर्ग, हर्णे". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2019-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ दापोली, तालुका. "गोवा किल्ला, हर्णे". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2019-03-31 रोजी पाहिले.
  6. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-07. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने