हर्बर्ट हूवर

अमेरिकन राजकारणी

हर्बर्ट क्लार्क हूवर (इंग्लिश: Herbert Clark Hoover) (ऑगस्ट १०, इ.स. १८७४ - ऑक्टोबर २०, इ.स. १९६४) हा अमेरिकेचा ३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९ ते ४ मार्च, इ.स. १९३३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

हर्बर्ट हूवर

हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२० च्या दशकामधल्या वॉरेन हार्डिंगकॅल्विन कूलिज यांच्या अध्यक्षीय राजवटींमध्ये त्याने वाणिज्यसचिवाचा पदभार वाहिला होता. हूवराला अध्यक्षीय निवडणूकमोहिमांचा काहीही अनुभव नसतानादेखील रिपब्लिकन पक्षाने इ.स. १९२८ च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याचे नामांकन जाहीर केले. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल स्मिथ याच्यावर त्याने घवघवीत मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकांचा किंवा सैनिकी पेशातील उच्चपदांवरचा अनुभव नसतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या दोन व्यक्तींपैकी हा एक (दुसरा म्हणजे विल्यम हॉवार्ड टाफ्ट) आहे.

इ.स. १९३० च्या दशकाच्या आरंभी पसरू लागलेल्या महामंदीचा हूवर प्रशासनाला सामना करावा लागला. त्यासाठी हूवर प्रशासनाने हूवर धरणप्रकल्पासारखे मोठे प्रकल्प हाती घेतले, स्मूट-हॉली टॅरिफ योजनेअंतर्गत कररचनेतील सर्वाधिक करचौकट २५%पासून ६३%पर्यंत पुढे रेटली; मात्र आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. परिणामी इ.स. १९३२ च्या अध्यक्षीय निवडणुकींत हूवर पराभूत झाला.

बाह्य दुवे

संपादन
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-01-17. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "हर्बर्ट हूवर: अ रिसोर्स गाइड (हर्बर्ट हूवर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठवटपौर्णिमाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रनालंदा विद्यापीठसंत तुकाराममहाराष्ट्रभारतसिकलसेलरायगड (किल्ला)शाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीज्ञानेश्वरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे संविधानमराठी संतपांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरगजानन दिगंबर माडगूळकरआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक दिवसपसायदानआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीहिंदू दिनदर्शिकामहाराष्ट्रातील किल्लेमुंजा (भूत)शिवाजी महाराजांची राजमुद्रामुरलीकांत पेटकरमहाराष्ट्रातील आरक्षणनामदेवमराठी भाषा